Breaking News

अत्याधुनिक केंद्राचा शानदार उद्घाटन सोहळा

मान्यवरांची लाभली उपस्थिती

पुणे ः प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. 26) संपन्न झाला. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
    पुण्यातील हडपसर येथे रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविद्यालयात लक्ष्मीबाई पाटील सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन व इनक्युबेटर या अत्याधुनिक केंद्राचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, एस. एम. जोशी व रामभाऊ तुपे यांच्या अर्धपुतळ्यांचे अनावरण, शताब्दी टॉवर, मुलींचे आंतरराष्ट्रीय वसतिगृह व खेळाच्या मैदानाचेही या वेळी उद्घाटन करण्यात आले. (पान 2वर..)
या सोहळ्यास रयतचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे-पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, आमदार तथा कार्यकारिणी सदस्य चेतन तुपे, प्राचार्य डॉ. अरविंद बुरंगले, उद्योजक प्रतापराव पवार, सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक राजेंद्र जगदाळे, टाटा टेक्नॉलॉजीचे पुष्कराज कोलगुड यांसह पदाधिकारी, रयतसेवक, शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply