Monday , January 30 2023
Breaking News

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे पनवेलच्या कोकण विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.

तसेच आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अनंत ठाकूर, जिमखाना चेअरमन डॉ. आर. ए. पाटील, उपप्राचार्य पी. पी. भस्मे, जी. जे. कोराणे, कार्यवाह व उपप्राचार्य ए. डी. आढाव, विद्यार्थी परिषद अध्यक्ष निखिल धुळणकर, क्रिडा शिक्षक एन. एस. शिरसाठ, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा. पी. वाय. कांबळे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक वर्ग यांनी केले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply