पनवेल : रामप्रहर वृत्त
काळण समाज, कवी रामदास शिंदे सार्वजनिक वाचनालय आणि पनवेल चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या 16व्या वर्धापन दिनानिमित खुली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा काळण समाज मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून 165 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून काळण समाज मध्यवर्ती अध्यक्ष मनोहर तेरडे, सचिव विजय वनगे, सुखदेव राजे, अशोक राम धरणे, सतीश चंदने, रश्मी काळण, साधना शिंदे आदी उपस्थित होते.
बुद्धिबळ स्पर्धा खुल्या गटात खेळविण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटातील प्रथम क्रमांकाचा स्व. शंकरराव यशवंत साखरे, सुवर्णा सतीश चंदने स्मृती फिरता चषक, तसेच रोख पारितोषिक लौकिक पांगशे (ठाणे) यांनी पटकाविले. खुल्या गटासह 15, 13, 9, 7 वर्षांखालील गट तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक अशा स्वतंत्र 43 गटांतील विजेत्यांना पारितोषिकांनी गौरविण्यात आले.
पनवेल चेस असोसिएशनचे अध्यक्ष गंभीर दांडेकर, उपाध्यक्ष समीर परांजपे, सचिव सी. एन. पाटील, खजिनदार परिणाम मुरे, सल्लागार मंगला बिराजदार, डॉ. प्रीतम म्हात्रे, राजेश खंडागळे, चिंतामणी रामतीर्थकर, विजयकुमार पाटील, स्पर्धा प्रमुख रमेश काळण यांनी नियोजनबद्ध पद्धतीने स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेसाठी प्रमुख पंच फिडे, अर्बिटर पवन राठी (पुणे), सहाय्यक पंच स्वप्नील ठीक, अंकीत जोशी, चेतन म्हाते, सुशील गुरत, गीतांजली हंग, आदर्श यादव, धीरज सर्दल, श्रेयस पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभास शंकर बिराजदार, साक्षी परांजपे, प्रदीप चंदने, मुकुंद सिंगासने, विलास म्हात्रे, नंदकुमार पालवे आदी उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …