Breaking News

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात; ३ ठार तर ८ जण जखमी

खोपोली : प्रतिनिधी

पाईप वाहून नेणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्याने पुढे कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो आणि ओमनी कारला जोरदार ठोकर देऊन भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१०) मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर पहाटे ४ च्या सुमारास घडली. या अपघातात ३ जण जागीच ठार झाले असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. तसेच या अपघातात ४ जण गंभीर तर ४ जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना एम जी एम हाॅस्पीटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबई लेनवर किमी 38:200 येथे ट्रक (के.ए ५६-३२७७) वरील चालक बालाजी वडर (वय 26) याचा ब्रेक फेल झाल्याने त्याचा ट्रक वरील नियंत्रण सुटून त्याने पुढे जाणाऱ्या कोंबडीची वाहतूक करणारा टेम्पो (एम.एच ०३ सीपी २४२८) व ओमनी (एम एच ११ वाय ७८३२) कार या वाहनांना ठोकर मारल्याने हा अपघात झाला. सदर अपघात ओमनी कार मधील दोन आणि ट्रक मधील एकाचा मृत्यू झालं आहे. या अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी एम जी एम हाॅस्पीटल कामोठे येथे रवाना करण्यात आले असून 3 मयत इसमांचे प्रेत पुढील कार्यवाही साठी खोपोली पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार यांनी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याचे चौथे लेनवर असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात ठिकाणी मदतीसाठी आय आर बी कडील देवदूत टिम, पेट्रोलींग टिम, मृत्युंजय दूत चे गुरूनाथ साठिलकर व टिम, खोपोली पोलीस स्टेशन कडील अधिकारी अंमलदार उपस्थित होते.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply