Tuesday , February 7 2023

फोरेट विष खाल्ल्याने पाच गायी मृत्युमुखी

रेवदंडा : प्रतिनिधी

बाहेर चरण्यासाठी सोडलेल्या तिन गायी व दोन खोंड यांनी फोरेट विष खाल्ल्याने मृत्यमूखी पडल्याची घटना कोर्लई येथील शेतात घडली, याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाणीवपुर्वक विष घातल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.

कोर्लई येथे शनिवारी (दि. 28) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जेरोने फ्रान्सिस पेय यांच्या शेताच्या दक्षिणेकडे चार किमी अंतरावर कोर्लई आगरीपाडा येथील भरत म्हात्रे यांची मालकीची आडमवली जातीची आठ वर्ष वयाची दहा हजार रूपये किमंतीची  एक लाल मोरी गाय, आडमवली जातीचा एक वर्ष वयाचा रूपये दोन हजार किमंतीचा एक काळा खोंड, आडमवली जातीची तिन वर्ष वयाची रूपये पाच हजार किमंतीची एक काळी मोरी गाय, आडमवली जातीची दोन वर्ष वयाची रूपये चार हजार किमंतीची एक काळी कबरी गाय, तसेच महेश नथुराम नाटूस्कर यांची कालवंड जातीची तीन वर्ष वयाची सात  हजार रूपये किमंतीची  लाल रंगाची गावठी गाय,तसेच ख्रिस्तियन फ्रान्सीस पेय यांच्या मालकीचा गावठी जातीचा दोन वर्ष वयाचा काळया रंगाचा तिन हजार रूपये किमंतीचा खोंड मृत्यूमूखी पडल्याचे आढळले.

यावेळी तिन गाय व दोन खोंड हे कोणतेतरी विषारी औषध कोंडयामध्ये टाकून  ठार मारल्याचे दिसत होते. यावेळी लगतच्या शेताच्या बांधावर  कोंडा चिकटलेला प्लॅष्टिक कागद आढळला असून कोंडामध्ये फॉरेट नावाचे विषारी औषधे गायी व खोंड यांना टाकून ठार जीवे ठार केले आहे. कोर्लई येथे आजूबाजूला वाल  भाजीपालाची लागवड करण्यात आली असून जाणीवर पुर्वक अज्ञातांनी गाय व खोंडाना फॉरेट विष कोंडयातून घालून ठार मारल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या बाबत रेवदंडा पोलिस ठाणे येथे कोर्लई येथील भरत म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात इसमाचे विरोधात भादविकलम 429 सह प्राण्यांना कु्ररतेने वागविणे, प्रतिबंधक अधिनियम 1960 नुसार कलम 11 (ब) (ग) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहा. फौजदार रमन महाले हे अधिक तपास करीत आहेत.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply