Breaking News

नगर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात तीन ठार

अहमदनगर ः प्रतिनिधी

नगर-सोलापूर महामार्गावर आंबिलवाडी फाट्याजवळ एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले आहेत. अरुणराव बाबुराव फुलसौंदर (वय 55), अर्जुन योगेश भगत (वय 12), ताराबाई शंकर भगत (वय 60) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला असून हे सर्व जण नगरचे आहेत. तर, अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले.

अक्कलकोट-मालेगाव ही एसटी (क्र. एमएच 14, बीटी 3337) बस नगरकडे येत होती. या बसची व नगरकडून सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या कारची नगर-सोलापूर महामार्गावरील आंबिलवाडी फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यु झाला असून हे तिघेही नगरचे रहिवासी आहेत. तर, अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना

मदत करण्यासाठी अपघातस्थळी धाव घेतली. नगर तालुका पोलिस स्टेशनला या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply