पनवेल : रामप्रहर वृत्त
वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील मटण व चिकन विक्रेत्यांनी मनमानीपणाने दर वाढविले आहेत. ही माहिती मिळताच वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे यांनी प्रत्यक्ष दुकानदारांशी भेट घेऊन मटण, चिकन पूर्वीच्याच दराने विकावे; अन्यथा दुकाने बंद केली जातील,
अशी तंबी दिली.
या वेळी अमर म्हात्रे यांच्यासमवेत तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष सीतारामशेठ नाईक, गाव अध्यक्ष नंदकुमार ठाकूर, अश्विन नाईक, गणेश पाटील, ग्रामसेवक केणी, गोपी भोईर, पदाजी नाईक, हिराजी गोंधळी, नरहरी ठाकूर, जयंत खोत, शुभम म्हात्रे, सुनील पाटील, कबीर, किशोर म्हात्रे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यापूर्वी मटण 560 रुपये व चिकन 200 ते 220 रुपये विकले जायचे, परंतु 1 जानेवारीपासून मटण 500 प्रतिकिलो, तर चिकन 180 प्रतिकिलोच्याच दराने विकले जाणार आहे.