Sunday , February 5 2023
Breaking News

रूचिता लोंढे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापलिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप, रिपाइं मित्रपक्ष युतीच्या रूचिता लोंढे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 2) दणकेबाज प्रचार केला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
या प्रचारावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, महिला ब बालकल्याण सभापती कुसुम म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, संतोष शेट्टी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, सीता पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, तसेच संजय जैन, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, युवा मोर्चा महापालिका अध्यक्ष दिनेश खानावकर, शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, प्रभाग 19चे अध्यक्ष पवन सोनी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी रूचिता लोंढे यांनी मतदारापर्यंचे आशीर्वाद घेतले.

Check Also

कामोठ्यातील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल …

Leave a Reply