Breaking News

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल माफ

मुंबई : प्रतिनिधी
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकर्‍यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
वारकरी दिंड्यांवर जास्त लक्ष द्या, असा आदेश मुख्यमंत्री शिंदे  प्रशासनाला दिल्या आहेत तसेच यासाठी निधी कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले आहेत. या वेळी बोलताना त्यांनी वारकर्‍यांच्या वाहनांना टोल फ्री करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि वारीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या चार हजार 700 बस सोडण्यात आल्याचे सांगितले.
वारकर्‍यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे याची काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे वारी यशस्वी होणार. या सर्व प्रक्रियेमध्ये पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, राज्यात सध्या पावसाने जोर धरला असून प्रशासनाकडून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Check Also

पतंग महोत्सवातून मकरसंक्रात सणाचा आनंद द्विगुणित

पनवेल : रामप्रहर वृत्तमकरसंक्रांत सणाच्या औचित्याने पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने नमो उत्सव अंतर्गत सोसायटीच्या …

Leave a Reply