Breaking News

रामशेठ ठाकूर विद्यालयात वेशभूषा स्पर्धा उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवारी

(दि. 1) पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी कोळी, आगरी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन अशा वेगवेगळ्या राज्यांची वेशभूषा धारण केली होती.

या कार्यक्रमाकरिता परीक्षक म्हणून अंजनी डाके यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना भांडवलकर यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य म्हात्रे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, कार्यकारिणी मंडळाचे सदस्य तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या ज. भ. शि. प्र. संस्थेचे सचिव डॉ. गडदे सर यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply