पनवेल : रामप्रहर वृत्त
वाकडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या पूजा संदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी नवनिर्वाचित सरपंच पूजा पाटील यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, शिरवली विभागीय अध्यक्ष शिवाजी दुर्गे, शांताराम पाटील, शशिकांत शेळके, माजी सरपंच नरेश पाटील, रंजना पाटील, उपसरपंच प्रभुदास खुटले, विनोद भोपी, वनिता चोरघे, शिमगी पवार, लक्ष्मी पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त
पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …