पनवेल : प्रतिनिधी
सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनिय कार्य करणारे, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ शनिवारी (दि. 8) सकाळी 9. 30 वाजता होणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण खासदार शरद पवार, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असणार असून या सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील हे असणार आहेत. या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ‘रयत’च्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुनिल भुसारा, ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधुकर भावे, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेच्या रायगड विभागीय अध्यक्ष बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले आदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘रयत’चे व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी दिली आहे.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper