Breaking News

सीकेटी महाविद्यालयात माहितीदूत उपक्रमाचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत आणि  युनिसेफ व राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ’युवा माहितीदूत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे  महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनेची माहिती प्रस्तावित करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे तसेच माहितीदूत मोबाइल अ‍ॅपचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अनुलोम सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी प्रसन्न गोडसे, भाग जनसेवक पनवेल व शिरीष भालेराव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, उपप्राचार्य डॉ. एस. के. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. सूर्यकांत परकाळे, कार्यकारी अधिकारी प्रा. गणेश साठे, प्रा. सत्यजित कांबळे, महिला कार्यकारी अधिकारी डॉ. योजना मुनीव व डीएलएलओचे प्रमुख डॉ. बी. एस. पाटील  यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. गणेश साठे यांनी आभार मानले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply