Breaking News

पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप

माणगाव तालुका पत्रकार संघाचा उपक्रम

माणगाव : प्रतिनिधी

पत्रकार दिनानिमित्त माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सोमवारी (दि. 6) उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या हस्ते येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना औषधे व फळवाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे सचिव सचिन देसाई यांनी केले. तहसीलदार प्रियांका आयरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गौतम देसाई, डॉ. दीपक देशमुख, नगराध्यक्ष योगिता चव्हाण, माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयअप्पा ढवळे, सरचिटणीस योगेश सुळे, माजी तालुका अध्यक्ष सुरेंद्र साली, कामगार आघाडीच्या तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, प्रा. सतीश बडगुजर, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ मानकर, भालचंद्र खाडे, बशीर करेल, विक्रांत गांधी, रमेश जैन, नामदेव शिंदे, बाळकृष्ण आंबुर्ले आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सलीम शेख, उपाध्यक्ष प्रभाकर मसुरे, कार्याध्यक्ष आजेश नाडकर, खजिनदार स्वप्ना साळुंके, ज्येष्ठ सल्लागार मजीद हाजीते, डॉ. आरिफ पागारकर, संतोष गायकवाड, निलेश म्हात्रे, अ‍ॅड सायली दळवी यांच्यासह सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply