Breaking News

महामार्ग पोलिसांकडून वाहतूक नियमांबाबत जनजागृती

पनवेल : वार्ताहर

महामार्गावरील अपघात थांबावेत यासाठी महामार्ग पोलिसांकडून वाहनचालक व प्रवाशांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून, हे पोलीस पथक ठिकठिकाणी जाऊन जनजागृती करीत आहे. या पथकाने सोमवारी (दि. 6)  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा नाका येथील थांब्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या इको व मिनीडोर चालकांमध्ये जनजागृती केली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पोलीस हवालदार सुदाम शिरसाठ, मनोज घारगे, किसन जाधव यांचा समावेश होता. वाहनांच्या काचा काळ्या असू नयेत, मर्यादेपेक्षा जास्त अवैध प्रवासी वाहतूक करणे गुन्हा आहे, महामार्गावर वाहन चालवताना ठरवून दिलेल्या गती मर्यादेचे पालन करणे याबाबत पोलिसांनी स्पीड डिटेक्टर यंत्राद्वारे माहिती देऊन वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्यासंबंधीचे आवाहन केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply