
कर्जत : प्रतिनिधी
नेरळ येथील आगरी समाज संघटनेच्या सामाजिक सभागृहात नुकतेच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या 2020 या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव, उपाध्यक्ष भगवान धुळे, सचिव शिवराम महाराज तुपे तसेच मनीषा दळवी, अरुण कराळे, भूषण पेमारे, सुरेश गोमारे, संतोष ऐनकर, दिलीप शेळके आदी पदाधिकार्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हुतात्मा हिराजी पाटील व भाई कोतवाल यांचा इतिहास तसेच तालुक्यातील स्वातंत्र्यसेनानींची माहिती या दिनदर्शिकेत समाविष्ट आहे. या वेळी स्वातंत्र्यसैनिक झिपरू गवळी यांची प्रतिमा सभागृहात लावण्यात आली. त्या प्रतिमेचे अनावरण गवळी यांचे जावई तरे यांनी केले.