Breaking News

‘तो’ प्रस्ताव म्हणजे मूर्खपणा : संदीप पाटील

मुंबई : प्रतिनिधी
भारताचे माजी तडाखेबंद फलंदाज संदीप पाटील यांनी कसोटीच्या नव्या चारदिवसीय संकल्पनेला विरोध केला आहे. जेव्हा त्यांना या संकल्पनेविषयी मतप्रदर्शन करण्यास सांगितले तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया होती ’हा मूर्खपणा आहे.’
यावर सविस्तर बोलताना पाटील म्हणाले की, सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटची जी समर्पक व्याख्या केली आहे, तेच माझेही म्हणणे आहे. मी जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू आहे. कसोटीतील पहिला दिवस हा वेगवान गोलंदाजांचा असतो आणि कसोटी क्रिकेट यातच त्या क्रिकेट प्रकाराचे वैशिष्ट्य सामावले आहे. ती विशेषता या कसोटीला चार दिवसांवर आणून आपण घालवून टाकणार आहोत का?
याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, इंग्लंडचे माजी गोलंदाज इयन बोथम, श्रीलंकेचा माजी फलंदाज महेला जयवर्धने यांनीही चार दिवसांच्या कसोटी क्रिकेटला विरोध दर्शविला आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply