Breaking News

सिडकोतर्फे पाणी देयक सुविधा ऑनलाइन स्वीकारणार

सिडको : वृत्तसेवा

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांना पाणी देयके ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2020 पासून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत. नवी मुंबई क्षेत्रातील सिडको प्रशासित गावे व काही नोड्सना सिडकोतर्फे पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावांतील व नोड्समधील सिडकोच्या नळ जोडणीधारकांकरिता  www.cidco.maharashtra.gov.in या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर पाणी देयके ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर पाणी देयके भरण्यासाठी नळ जोडणीधारकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. पाणी देयकाची प्रत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नळ जोडणीधारकांना आपल्या पाणी देयकाचे शुल्क अदा करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस यांपैकी एका पर्यायाची निवड करता येईल. शुल्क भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरल्याची ऑनलाइन

पावतीही उपलब्ध होईल. दि. 1 जानेवारी, 2020 पासून नोड्ल कार्यालयांमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे बंद करण्यात आली असून पाणी देयके केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच रोख, चेक, डीडी अशा कोणत्याही स्वरूपात पाणी देयके स्वीकारण्यात येणार नाहीत. ऑनलाइन पद्धतीद्वारे पाणी देयके प्राप्त करण्यास किंवा शुल्क भरण्यास काही अडचणी उद्भवल्यास नळ जोडणीधारकांनी संबंधित नोड्मधील पाणी पुरवठा विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

वेळेचीही होणार बचत

ऑनलाइन पद्धतीमुळे पाणी देयक भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ व जलद रीतीने पार पडून नळ जोडणीधारकांना सिडको कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासणार नसल्याने त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply