कर्जत : बातमीदार
मुंबई विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालय रग्बी स्पर्धेत नेरळ येथील मातोश्री टिपणीस वरिष्ठ महाविद्यालयाने मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकाविले.
मुंबई विद्यापीठाची रग्बी स्पर्धा 12 ते 16 एप्रिल या कालावधीत कल्याण येथील बिर्ला कॉलेज येथे झाली. या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नॅशनल स्पर्धेत नेरळ येथील विद्या मंदिर मंडळाच्या मातोश्री सुमती टिपणीस कॉलेज महाविद्यालयाच्या संघाने अंतिम विजय मिळवित सुवर्णपदक जिंकले.
रब्बी खेळाडू निता राठोड आणि हर्षदा कोळंबे यांच्या संघाने हे सुवर्णपदक मिळविले आहे. नेरळ येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे हे दोन्ही खेळाडू रायगड जिल्हा रग्बी असोसिएशनशी संलग्न आहेत. या खेळाडूंचे आणि क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक केशव पवार यांचे रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी अभिनंदन केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …