Breaking News

पिंपळोली येथे आधार कार्ड नोंदणी शिबिर

कर्जत : बातमीदार

महेश भगत फाउंडेशनच्या माध्यमातून फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भगत यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 10) पिंपळोली (ता. कर्जत) ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांसाठी आधार कार्ड नोंदणी शिबिर घेण्यात आले. त्यात 150 हून अधिक ग्रामस्थांनी आधार कार्ड नोंदणी केली.  ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन सरपंच चंद्रकांत निर्गुडा यांच्या हस्ते झाले. यावेळी  महेश भगत, ग्रामपंचायत सदस्य दिलीप शेळके तसेच दीपक काळण, संतोष मुने, नरेंद्र गोमारे, ज्येष्ठ ग्रामस्थ दादा पाटील, वामन शेळके, जानू पारधी, कैलास विरले, गणेश मसने, नरेश शेळके, ज्ञानेश्वर खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कशेळे येथील आधार कार्ड केंद्र संचालक म्हसे यांनी आपली सर्व यंत्रणा पिंपळोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावली होती. फाउंडेशन उपाध्यक्ष नरेश शेळके, सदस्य किरण केवणे, भरत शेळके, सुधीर भगत, मनोज डायरे, अशोक भगत, पुंडलिक पाटील, गणेश गवळी आदींनी हे शिबिर यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न केले.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply