खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त
श्री संत वामनभाऊ व भगवान बाबा सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 11) भेट देऊन दर्शन घेतले. या वेळी आयोजकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह या अखंड हरिनाम सप्ताहास कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ये वाय. टी. देशमुख, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत पाटील, प्रभाग समिती ब अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक मनोहर म्हात्रे, नगरसेविका सीता पाटील, लीना गरड, भाजप नेते मोतीलाला कोळी, सदानंद पाटील आदी उपस्थित होते.