पनवेल : जिल्हा प्रशासन लातूर आणि जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा महोत्सव 2020 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयाने एकांकिका स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त करत राष्ट्रीय पातळीवरील होणार्या राष्ट्रीय युवा महोत्सवात एकांकिका स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यार्थ्यांने गुरुवारी अभिनंदन केले.