Monday , February 6 2023

पनवेलमध्ये रायगड सरस प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा परिषद रायगडच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागामार्फत पनवेल येथे रायगड सरस-विक्री व प्रदर्शन 2020 ला रायगड जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा योगिता पारधी यांनी भेट दिली. त्यांच्यासमवेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्पसंचालक प्रकाश देवऋषी, काशिनाथ पाटील, पंचायत समिती उरणचे सहाय्यक गटविकास अधिकारी के. बी. अंजने, जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ आदी उपस्थित होते.

पनवेल येथे गुजराती शाळा मैदान, पटवर्धन हॉस्पिटलसमोर रायगड सरस 2020 महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि. 9 ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासहित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व जळगाव येथील 60 स्वयंससहाय्यता समूहांनी सहभाग घेतला असून ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःबनवलेल्या आकर्षक, शोभिवंत तसेच गृह्योपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीस आणले आहेत. त्याचप्रमाणे स्वादिष्ट खानावळीची लज्जत चाखण्याची उत्तम संधी खवय्यांना उपलब्ध झाली आहे. तसेच या प्रदर्शन खास आकर्षण म्हणून भारतातील सर्वात मोठा 11 फूट लांबीचा व सात फूट उंचीचा 1000 किलो वजन असलेला बैल पाहण्यास ठेवलेला आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply