नागोठणेच्या रिलायन्स मैदानावर रणजी सामन्यास प्रारंभ
नागोठणे : प्रतिनिधी
रिलायन्सच्या मैदानावर शनिवारी (दि. 11) महाराष्ट्र आणि झारखंड यांच्यातील रणजी सामना सुरू झाला. या वेळी महाराष्ट्राच्या संघाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा फसला असल्याचे दिसून आले होते.
महाराष्ट्राचे पाच फलंदाज अवघ्या 88 धावांतच तंबूत परतले असतानाच आझीम काझी याच्या जोडीला आलेल्या यष्टीरक्षक विश्रांत मोरे याने मोलाची साथ देत महाराष्ट्राच्या संघाला सावरले. शेवटची सहा षटके शिल्लक असताना विश्रांत मोरे याच्या कमरेला कळा येऊ लागल्याने 67 धावांवर तो निवृत्त होऊन तंबूत परतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अझीम काझी 70 आणि सत्यजीत बच्छाव 5 धावांवर खेळत आहेत. काझीने 254 मिनिटे मैदानात राहून 165 चेंडू खेळत 7 चौकार आणि 2 षटकार मारले, तर निवृत्त झालेला विश्रांत मोरे 179 मिनिटे खेळत त्यानेसुद्धा 7 चौकार आणि 2 षटकार मारले. झारखंडकडून राहुल शुक्ला आणि उत्कर्ष सिंग यांनी प्रत्येकी 2, तर अजय यादव याने एक बळी मिळविला.
धावफलक महाराष्ट्र (फलंदाजी) : स्वप्निल गुगले 25, जय पांडे 0, नौशाद 01, अंकित बावणे 37, अझीम काझी नाबाद 70, विशांत मोरे (निवृत्त) 67, सत्यजीत बच्छाव नाबाद 05.
झारखंड (गोलंदाजी) : अजय यादव 15-05-37- 1, राहुल शुक्ला 15-05-20 -2, वरुण एरॉन 16-03 -45-0, अनुकूल रॉय 17- 02-62-0, उत्कर्ष सिंग 25-09-54-02, सौरभ तिवारी 01-0-03-0.