नेरूळ : प्रतिनिधी
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आयईएस नवी मुंबई शाळेच्या संघाने अंजुमन इस्लाम शाळेच्या संघावर मात करीत स्पर्धेत बाजी मारली.
या स्पर्धेत एकूण 26 संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत आयईएस संघाने उत्कृष्ट खेळ केला.
एनएमएसएचे प्रमुख दिलीप नायक, नवी मुंबई हायस्कूलचे मुख्याध्यापक किसन पवार, शालेय प्रशिक्षक अंजली गिरी, अरविंद गोसावी, प्रशिक्षक साटम यांनी विजेत्या संघाचे विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper