Saturday , March 25 2023
Breaking News

ब्राह्मण सभेचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात

पनवेल ः वार्ताहर : ब्राह्मण सभा नवीन पनवेल या संस्थेचा वर्धापनदिन व स्नेहसंमेलन सोहळा पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षणमहर्षी बापूसाहेब नेने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व परशुरामपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणार्‍या ज्ञातिबांधवांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कर्करोगाशी झुंज देऊन बीएससी परीक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सृष्टी कुलकर्णी हिचा सन्मान करण्यात आला, तसेच तिला वैद्यकीय मदतीसाठी दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. पळस्पे येथील जनकल्याण सेवाश्रमातील ज्येष्ठ नागरिक व निराधार मुलांना सहकार्य करणार्‍या युवकांना याप्रसंगी गौरविण्यात आले. यानंतर बापूसाहेब नेने यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यामध्ये सादर झालेल्या एकांकिका प्रमुख आकर्षण ठरले. दिग्दर्शक डॉ. दिलीप रामबक्ष दिग्दर्शित ‘ऑपरेशन दगड’ ही एकांकिका सादर झाली. त्यानंतर नवीन पनवेल येथील प्रसिद्ध लेखक शंकर आपटे लिखित ’नऊवारी नवलाई’ या एकांकिकेचे सादरीकरण झाले. त्याचे दिग्दर्शन मोहन हिन्दुपूर व वैशाली केतकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सभेचे अध्यक्ष डॉ. अरविंद बेलापूरकर, उपाध्यक्ष शंकर आपटे, सचिव नृपाली जोशी, सहसचिव मृदुला वैशंपायन, खजिनदार दीपाली जोशी, सहखजिनदार सुरेंद्र कुलकर्णी यांसह सर्व ज्ञातिबांधवांनी मोलाचे योगदान दिले.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply