Monday , January 30 2023
Breaking News

भाजप पदाधिकार्यांची निवड

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते मोहोपाड्यात नियुक्तीपत्रे प्रदान

मोहोपाडा : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर तसेच आमदार महेश बालदी यांच्या निर्देशानूसार भारतीय जनता पार्टीतर्फे मोहोपाड्यात पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये वासांबे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्षपदी सचिन तांडेल, उपाध्यक्षपदी मंदार गोपाले तर वासांबे पंचायत समिती गण अध्यक्षपदी आकाश अमृत जुईकर, चांभार्ली पंचायत समिती अध्यक्षपदी भुषण पारंगे यांची निवड करण्यात आली, असून त्यांना उरणचे आमदार महेश बालदी व तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी निवडपत्र प्रदान केले आहे. तसेच राष्ट्रीय सर्व श्रमिक संघ कामगार संघटनेच्या रायगड जिल्हा सरचिटणीस पदावर आकाश अमृत जुईकर यांची निवड करण्यात आली आहे. भाजप संलग्न कामगार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने आकाश जुईकर यांची निवड करण्यात आल्याचे भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद जाधव, सरचिटणीस अ‍ॅड. सुरेश कोलते यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. दरम्यान, भाजपच्या वासांबे मोहोपाडा विभागीय अध्यक्षपदी सचिन तांडेल, उपाध्यक्षपदी मंदार गोपाले तर वासांबे पंचायत समिती अध्यक्षपदी आकाश जुईकर, चांभार्ली पंचायत समिती अध्यक्षपदी भुषण पारंगे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply