Breaking News

उरण नगर परिषदेत दिव्यांगांना मतदान यंत्रे व व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक

उरण ः वार्ताहर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने  रायगड जिल्हाधिकारी  तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 190 उरण विधानसभा मतदारसंघ यांच्या सूचनेनुसार  मंगळवारी (दि. 5 ) उरण  नगर परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते. सदर कार्यक्रम उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमास सुमारे 180 दिव्यांग उपस्थित होते.

या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना मतदार नाव नोंदणीसंबंधी माहिती  देण्यात आली. मतदार यादी पुनर्निरीक्षण, व्हीव्हीपॅट मशिनचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तींना उपलब्ध असणार्‍या सुविधांबद्दल माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे दिव्यांगांना जाणवणार्‍या मतदानविषयक शंकांचे निरसन करण्यात आले. राष्ट्रीय निवडणूक आयोग दिव्यांग मतदारांविषयी संवेदनशील असल्याचे नमूद करण्यात आले. याप्रसंगी उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, संतोष पवार, नरेंद्र उभारे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply