Breaking News

जैवविविधता व्यस्थापनामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, उपयोजन करता येईल

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन

पनवेल ः प्रतिनिधी
पीबीआरमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात येणारे घटक जसे शेतकीय जैवविविधता, वन्य जैवविविधता, नागरी जैवविविधता, वनौषधी, वैदू-वैद्य या विषयीच्या नोंदवहीचा भविष्यात नक्कीच उपयोग होणार असून, यानिमित्ताने पनवेल हद्दीतील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व उपयोजन करता येईल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ते जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते.
पनवेल महापालिकेची जैवविविधता व्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवारी (दि. 19) दुपारी 3 वाजता महापालिकेत झाली. महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली.
या बैठकीस नगरसेवक अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला घरत, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, वनविभागाचे प्रतिनिधी संजय पाटील, कृषी विभागाचे प्रतिनिधी बी. एस. सत्रे, स्थानिक शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी भगवान पाटील, स्थानिक कोळी समाजाचे देवचंद्र कोळी, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ दिपाली मनमानडकर, पक्षीतज्ञ निखिल भोपळे आदी उपस्थित होते.
या वेळी डॉ. श्याम बजेकल यांनी पीबीआर अर्थात लोक जैवविविधता नोंदवही काय-का-कसे या विषयावर प्रेझेटेंशन केले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील जैवविविधतेच्या अनुषंगाने समाविष्ट करण्यात येणार्‍या घटकांची माहिती त्यांनी दिली.
या वेळी श्री मयुरेश्वर महिला व बालकल्याण संस्थेच्या श्रीमती शेबेंकर यांनी ही नोंदवही तयार करताना येणारे घटक, नोंदवहीचा जैवविविधता टिकविण्यासाठी होणारा उपयोग, त्याचे फायदे याविषयी माहिती दिली.
या वेळी उपस्थित समिती सदस्यांनी आपल्या सूचना मांडल्या. आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही या जैविविधता नोंदवहीमध्ये पनवेल हद्दीतील वेगवेगळ्या वनस्पती समाविष्ट करण्यात येण्याविषयीच्या आपल्या सूचना मांडल्या, तर उपस्थित सदस्यांनी जैवविविधतेविषयी चर्चा केली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply