मुंबई : रामप्रहर वृत्त
तौत्के चक्रीवादळ व मुसळधार पावसामुळे राज्यातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा युध्दपातळीवर सुरळीत केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक केले आहे.
चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रणकक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच अधिकाधिक मनुष्यबळ याकामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (संचलन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (पारेषण) श्रीकांत राजूरकर यांनी संबंधीत मुख्य अभियंते व अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या सूचना देऊन दुरुस्तीच्या कामाबाबत वारंवार पाठपुरावा केला.