Breaking News

आता सामना ऑस्ट्रेलियाशी; आजपासून वन-डे मालिका

मुंबई : प्रतिनिधी
श्रीलंकेला टी-20 मालिकेत पराभूत करणार्‍या भारतीय संघाचा सामना आता तुल्यबळ ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उभय संघांतील तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेला बुधवार (दि. 14)पासून सुरुवात होत असून, पहिली लढत मुंबईत रंगणार आहे.
टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघाने गतवर्षीच्या शेवटी वेस्ट इंडिजला वन-डे आणि टी-20 मालिकेत धूळ चारली. त्यानंतर नववर्षातही श्रीलंकेला लीलया हरवून विजयी सलामी दिली. या दोन संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया संघ भरात आहे. युवा खेळाडू विशेषत: मार्नस लाबूशेनने चांगली कामगिरी केली आहे. अशातच ऑसी कर्णधार अरॉन फिन्चने भारताला भारतात हरवू शकतो, असे विधान केले आहे. या पार्श्वभूमीवर ही
मालिका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
रोहित-शिखर विक्रमाच्या उंबरठ्यावर
भारतीय संघाची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि शिखर धवन आता एका विक्रमाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि शिखर यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली, तर वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या संघविरुद्ध सर्वाधिक शतकी भागिदारी करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा होऊ शकतो. या दोघांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध
22 डावांत सहा वेळा शतकी भागिदारी केली आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply