Breaking News

कामोठे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दि. बा. पाटील यांची जयंती

कामोठे : रामप्रहर वृत्त

प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते माजी खासदार दि. बा. पाटील यांची 94 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमात दि. बा. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे माजी चेअरमन बाळाराम चिपळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एस. एम. खरात यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना दिली.

तसेच या महानव्यक्तीच्या जयंती निमित्ताने विद्यालयात आदित्य ज्योत फाऊंडेशन यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्याचबरोबर विद्यालयातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी इयत्ता पाचवीच्या स्नेहा लुगडे व आठवीच्या विठ्ठल पालवे यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यालयातील शिक्षक चिपळेकर आर. बी. यांनी उपस्थित मान्यवरांचे, शिक्षकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल …

Leave a Reply