
पनवेल : तालुक्यातील खानावळे गु्रप ग्रामपंचायतीच्या उपसरपंपदी भारतीय जनता पक्षाचे राजेश लबडे यांची सोमवारी (दि. 13) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांंनी नवनिर्वाचित उपसरपंच लबडे यांचे अभिनंदन केले. या वेळी महादेवशेठ पाटील, प्रवीण खंडागळे, ज्ञानेश्वर सुर्वे, राकेश ठाकूर, शिवाजी ठोंबरे, संभाजी पाटील, दिनेश लबडे, विनोद गायकवाड, सुनील चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.