Saturday , March 25 2023
Breaking News

शिवसेना शाखाप्रमुखपदी विलास पाटील

पनवेल ः शिवसेना पक्षप्ररमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते उद्योगमंत्री, संपर्कनेते कोकण विभागाचे सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार उत्तर रायगड जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत रायगड (पनवेल) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या सहमतीने व पनवेल तालुका उपमहानगरप्रमुख दीपक घरत तसेच खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर यांच्या वतीने विलास पाटील यांची खारघर प्रभाग क्रमांक 6च्या सेक्टर 10 शिवसेना शाखाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. या वेळी त्यांचे पनवेल तालुका संघटक सुजाता कदम, उपमहानगरसंघटक लिना पाटील, विभाग संघटक वैशाली सावंत, विभागप्रमुख मनिष पाटील, विभाग संघटक रामचंद्र देवरे, विभागप्रमुख सावंत, विभागप्रमुख उत्तम मोर्बेकर यांच्यासह शिवसेनेच्या इतर महिला आघाडी व पदाधिकार्‍यांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे.

रिक्षा अपघातात चारजण जखमी

पनवेल ः खारघर येथे एका भरधाव वाहनाने रिक्षेला दिलेल्या धडकेत रिक्षा चालकासह इतर तीनजण जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खारघर सेक्टर 10 येथे राहणारी मीर वाहित अकबर अली या त्यांच्या सातवर्षीय मुलगा अयमान याची तब्येत बरी नसल्यामुळे त्या मुलाला घेऊन त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे चालल्या होत्या. मीर अली आपल्या मुलांसह तिची बहिण कनिज फातिमा असे सर्वजण तळोजा येथील रिक्षाने खारघर येथील डॉक्टरकडे येत होते. त्यावेळी हा अपघात घडला.

Check Also

राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …

Leave a Reply