Breaking News

नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल -नायब तहसीलदार भालेराव

कर्जत : प्रतिनिधी

बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन स्वास्थ ही महत्वाची चतुसुत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असा विश्वास कर्जतचे नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी

येथे केले.

राज्य परिवहन महामंडळातर्फे 11 ते 25जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षा अभियान राबविण्यात येते. त्यानिमित्त कर्जत आगारात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ नायब तहसीलदार संजय भालेराव व आगार प्रमुख शंकर यादव यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी संजय भालेराव बोलत होते. चालक, वाहकांनी प्रवाशांच्या सुरक्षेला सदैव प्राधान्य द्यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सुरक्षित प्रवासासाठी एकमेव आणि सर्वोत्तम पर्याय एसटी हाच आहे, याची जाणीव प्रवाशांना करून देणे गरजेचे आहे. प्रवाशी आणि एसटी यांच्यातील विश्वास आणि नाते बळकट करण्यासाठी  चालकाशिवाय दूसरा चांगला दूवा नाही, असे आगार प्रमुख शंकर यादव यांनी सांगितले.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले. लेखाकार अंकुश राठोड, सहाय्यक वाहतूक निरीक्षक देवानंद मोरे, एल. के. कुंभार, दीपक देशमुख, नागेश भरकले, कृष्णा शिंदे, एच. आर. छत्तीसक, एस. टी. कोंजर, वि. पी. बागुल यांच्यासह चालक, वाहक आणि अन्य कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply