Monday , January 30 2023
Breaking News

ज्युनियर रायगड श्री 2020 अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड बॉडी बिल्डर्स अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन सलग्न शेळके जीमच्या वतीने आई गावदेवी चषक ज्युनियर रायगड श्री 2020 जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या शुक्रवारी (दि. 18) पनवेलजवळील आदई गाव येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी ज्युनियर रायगड श्री, दिव्यांग रायगड श्री, मास्टर रायगड श्री, ज्युनियर मेन फिजिक रायगड श्री अशा प्रकारांत शरीरसौष्ठवपटूंमध्ये चुरस दिसेल. विजेत्यांना पदक, चषक व आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे, तसेच सहभाग घेणार्‍या सर्व स्पर्धकांना चषक देण्यात येईल. यातून निवडण्यात येणारा संघ 26 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे होणार्‍या ज्युनियर महाराष्ट्र श्री या स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे, अशी माहिती निमंत्रक दिपेश शेळके व दिनेश शेळके यांनी दिली.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply