Breaking News

‘टाटा स्टील’कडून आदिवासी पाड्यांना दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त

टाटा स्टीलने निफानवाडी या आदिवासी पाड्याचे रूप पालटून टाकण्यासाठी पावले उचलली आहेत. निफानवाडी हा आदिवासी कुटुंबांचा अधिवास असलेला पाडा रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील टाटा स्टीलच्या सावरोली पंचायत प्रकल्पाच्या नजीक आहे. या निवासी पाड्यामध्ये 22 झोपड्या असून सध्या या एकूण वस्तीची अवस्था फारच बिकट झालेली होती. विशेषतः पावसाळ्यात येथे पाणी साचून राहण्याच्या समस्येने रहिवासी खूपच त्रस्त झालेले होते, मात्र टाटा स्टीलच्या या उपक्रमामुळे पाड्यामधील सुमारे 130 रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आपल्या कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) एक भाग म्हणून, टाटा स्टीलने या घरांच्या फेरविकासाकरीता (नूतनीकरणासाठी) मदतीचा हात पुढे केला. मातीमध्ये मुरूमची भर घालून या संपूर्ण परिसरातील भूभाग उंचावण्याचे कार्य केले आणि त्यावर काँक्रीट पसरवून टाकला. असे केल्यामुळे आता पावसाळ्याच्या दिवसांत येथील झोपड्यांमध्ये पाणी शिरण्यास प्रतिबंध होऊ शकेल. त्या खेरीज या पाड्याला जोडणारा आणि सर्व मोसमात टिकून राहील असा काँक्रीटचा रस्तादेखील येथे बांधण्यात आला. या उपक्रमामुळे सुमारे 130 रहिवाशांना लाभ पोहचणार असून हे सर्वच रहिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत.

निफानवाडीच्या रहिवाशी लता पवार म्हणाल्या, पूर्वी पावसाळ्यात येथील रस्ता पाण्याखाली बुडून जात असल्याकारणाने आमच्या वस्तीचा आजूबाजूच्या संपूर्ण परिसराशी संपर्क पूर्णपणे तुटून जात असे, परंतु आता या नवीन बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्यामुळे आम्ही संपूर्ण वर्षभर कुठेही ये-जा करू शकतो. या महत्वपूर्ण मदतीसाठी आम्ही टाटा स्टीलचे मनापासून खूप आभारी आहोत.  स्टील क्षेत्रातील या दिग्गज कंपनीचा सीएसआर विभाग आरोग्यसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण आणि महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रातील समुदायांशी जवळीकीने कार्य करत असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देत आला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply