पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी देशवासीय सज्ज झाले आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा अभियानाचा एक भाग म्हणून भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन बुधवारी (दि. 10) करण्यात आले होते. भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखी आयोजित ही बाईक रॅली पनवेल, नवीन पनवेल परिसरातून फिरवून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत जनजागृती करण्यात आली.
भाजप युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, अभिषेक भोपी, अक्षय सिंग, श्रवण घोसाळकर यांच्या माध्यमातून या बाईक रॅलीचे आयोजन केले गेले होते. या रॅलीला खांदा कॉलनी भाजप कार्यालयापासून सुरुवात झाली. नवीन पनवेल, आदई तलाव, आदई सर्कल, सीकेटी विद्यालय, एचडीएफसी सर्कल, पनवेलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक असे मार्गक्रमण करीत शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयाजवळ बाईक रॅलीची सांगता झाली. या मध्ये भारत माता की जय, वंदे मातरम् अश्या घोषणांनी परिसर दणाणला होता.
या बाईक रॅलील भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चा शहर अध्यक्ष रोहित जगताप, उपाध्यक्ष अभिषेक भोपी, विवेक होन, उदित नाईक, देवांशु प्रभाळे, अक्षय सिंग, श्रावण घोसाळकर, मयुर आंग्रे, साहिल नाईक, तन्मय बिरांजे, प्रज्योत कल्याणकर, शुभम कांबळे, रोहित कोळी, सिद्धेश खानावकर, जयेश घरत यांच्यासह भाजप आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Check Also
सरके चुनर… हटाव मोहीम सफल
गाणं कोणतेही का असेना ते लिहिताना, स्वरबद्ध करताना, त्यावर संगीतसाज चढवताना, त्याचे चित्रीकरण करताना, त्यावरची …
RamPrahar – The Panvel Daily Paper