Breaking News

सीआयएसएफचा जवान बेपत्ता, उरण पोलिसांकडून शोध सुुरू

उरण : प्रतिनिधी

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा वाल्मिकी ज्ञानेश्वर देवरे हा 30 वर्षीय जवान सोमवारपासून घरच्यांशी भांडण करून बेपत्ता झाला आहे. या बेपत्ता जवानांचा उरण पोलिसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी

दिली आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात सीआयएसएफमध्ये काम करणारा वाल्मिकी ज्ञानेश्वर देवरे हा 30 वर्षीय जवान प्रकल्पाच्या शेजारीच असलेल्या डाऊर नगर येथील इमारतीत आपल्या कुटुंबियांसह राहात होता. मात्र घरच्यांशी भांडण करून 13 जानेवारी 2019 पासून कुणालाही न सांगताच बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी बेपत्ता जवानांचा शोध घेतल्यास सुरुवात केली आहे. तपासात जवानाला दारुचे व्यसन लागले आहे. यातूनच त्याचे घरच्यांशी वाद होत होते. सोमवारीही जवान घरच्यांशी भांडून रागातच घराबाहेर पडून बेपत्ता झाला आहे. हा जवान त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहे. त्यामुळे त्याचा लवकरच सुगावा लागेल असा ठाम विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply