Breaking News

मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे लायकच नाहीत; खासदार नारायण राणेंचा पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेले भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणे होते, अशा शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पलटवार केला आहे. त्यांच्या भाषणात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. शेतकर्‍यांचे प्रश्न, योजना, कोरोनाचे संकट याबाबत त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मुख्यमंत्र्यांना काय बोलावे, कसे बोलावे हे अजून कळत नाही. मुख्यमंत्रिपदासाठी हा माणूस लायकच नाही, अशी जळजळीत टीकाही राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून राणे पिता-पुत्रांवरही टीका केली होती. त्याला उत्तर देताना खासदार नारायण राणे म्हणाले की, महाराष्ट्राशी बेईमानी करून हा माणूस मुख्यमंत्री झाला. मोदींचे नाव घेऊन निवडणूक जिंकली आणि सेक्युलर पक्षांशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रिपद मिळवले. युती केल्याने शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. नाही तर 25 आमदारही आले नसते. एकतरी काम हे मी केले असे त्यांनी दाखवावे. जीडीपी कळतो का? राज्याची अर्थव्यवस्था कळते का? अधिकारी हसतात यांच्यावर. बुद्धू आहे म्हणतात. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल. त्यामध्ये एक मंत्री आत जाईल व तो मुख्यमंत्री पुत्र आहे, असा आरोपही खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला. मला आणि माझ्या मुलांना बेडूक म्हणतो हा माणूस? बेडूक तर पुढे जातो. गांडूळ दोन दिशांना जातो. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवना मुख्यमंत्री केले नसते. पुन्हा राणे कुटुंबीयांवर आरोप कराल तर गेल्या 39 वर्षांत शिवसेनेत जे काही पाहिले ते सारे बाहेर काढेन, असा गर्भित इशाराही खासदार राणे यांनी या वेळी दिला. 

तुम्ही ‘श्रावणबाळ’ जन्माला घातलाय का? -आ. नितेश राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन मुलांवर टीका केली होती. ठाकरे यांनी नारायण राणेंची बेडकाशी तुलना केल्यानंतर पुत्र नितेश यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही काय नशा करून मुलींवर अत्याचार करणारा श्रावणबाळ जन्माला घातला आहे का?’, असा खोचक सवाल नितेश यांनी ठाकरे यांना विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नारायण राणे यांच्यावरही टीका केली. ठाकरे यांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी ट्विट करून आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. ‘दुसर्‍यांची पिल्लं वाईट. मग यांनी काय त्या दिनोच्या खुशीत नशा करून मुलींवर अत्याचार करणारा श्रवणबाळ जन्माला घातला आहे का? इतकी खुमखुमी आहे ना मग ती दिशा सॅलियनची केस मुंबई पोलिसांवर कुठला ही दबाव न टाकता निःपक्षपाती चौकशी करून द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते!’, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply