Breaking News

पोलीस आयुक्तालय नवी मुंबईतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, सुधागड हायस्कूलचा तिहेरी सन्मान

पाणदिवे : रामप्रहर वृत्त

पोलीस आयुक्तालय नवी मुंबई आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि. 16) कळंबोलीच्या पोलीस मुख्यालय येथे झाला. अभियान समारोप आरएसपी विद्यार्थ्यांच्या दिमाखदार संचलनात झाला.

या वेळी घेण्यात आलेल्या संचलन स्पर्धेत कळंबोलीच्या सुधागड हायस्कूल मुलींच्या आरएसपी पथकाने प्रथम क्रमांक पटकावला, तसेच परेडची परेड कमांडर म्हणून सुद्धा विदयालयाची विद्यार्थ्यांनी नेहा सकुंडे हिचा तर रस्ता सुरक्षा अभियानात पोलीस आयुक्तालय नवी मुंबईस दिलेल्या विशेष योगदानाबद्दल सुधागड हायस्कूलचे शिक्षक व आरएसपी नवीमुंबईचे कमांडंट विलास पाटील यांचा विशेष सन्मान असा एकूण सुधागड हायस्कूल कळंबोलीस तिहेरी सन्मान मिळाला. हे सर्व सन्मान नवीमुंबई चे पोलीस आयुक्त संजय कुमार व प्रसिद्ध सिनेअभिनेता संतोष जुवेकर, पोलीस उपआयुक्त सुनिल लोखंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगी पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. हा सन्मान स्विकारण्यासाठी  प्राचार्य राजेंद्र पालवे तसेच कार्यालयीन अधीक्षक दत्ता शिंदे,  शिक्षक व नवी मुंबईचे आरएसपी कमांडंट विलास पाटील तसेच प्रशिक्षक विकास नाईक, शिक्षिका ऋजुल वाशिकर उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply