Breaking News

‘आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा’

पनवेल : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होत असल्याने  कोणीही  विनापरवानगी कोणताही बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज वा पक्ष प्रचार कार्यालय वा झेंडे वा कोणतीही निशाणी प्रदर्शित करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक आचारसंहिता पथक प्रमुख, जमीर लेंगरेकर यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यासाठी रविवारी (10 मार्च)  मुख्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद बोलावल्यावर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक आचारसंहिता पथक प्रमुख, जमीर लेंगरेकर यांनी नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा व विधान परिषद सदस्य तथा लोकसभा सदस्य तथा पदाधिकारी तथा राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना आचारसंहितेत विनापरवानी कोणताही बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज वा पक्ष प्रचार कार्यालय वा झेंडे वा कोणतीही निशाणी प्रदर्शित करू नये.

आपण स्वतः किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी असे कोणतेही बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज वा झेंडे लावले असतील तर त्वरित ते स्वतःहून काढून टाकावेत. परवानगी शिवाय कोणताही निवडणूक प्रचार करू नये.

आचारसंहिता लागू झाल्यानंतर असे आपल्या नावाने कोणतेही विनापरवानी निवडणूक प्रचार कृत्य केल्याचे आढळून आल्यास कोणतीही हयगय केली जाणार नाही वा कायदेशीर कारवाईपासून संरक्षण मिळणार नाही. यासाठी आपणास आवाहन करण्यात येते की आजच अशा उपरोल्लेखित बाबी काढून टाकून प्रशासनास सहकार्य करावे व आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply