Breaking News

कबड्डी स्पर्धेत मुद्रे संघ विजेता

कर्जत : बातमीदार
हुतात्मा हिराजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या मानिवली येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कर्जत मुद्रे येथील नवकुमार संघाने विजेतेपद पटकाविले.
रायगड जिल्ह्यात देशी मातीतील रांगडा खेळ असलेल्या कबड्डी स्पर्धेची परंपरा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कबड्डी स्पर्धा होत असतात. अशाच प्रकारे जय भवानी कबड्डी संघाने पुढाकार घेऊन आणि मी सरपंच ग्रुप तसेच मानिवली हुतात्मा स्मारक समिती यांच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आली. तालुक्यातील 16 संघ या स्पर्धेत कर्जत तालुका कबड्डी असोसिएशनने निवडले होते.
मध्यरात्रीनंतर झालेल्या अंतिम सामन्यात कर्जत शहरातील नवकुमार मुद्रे संघाने नेरळच्या जाणता राजा संघाचा पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरले. जय मल्हार मानिवली संघाने तिसरा, तर भैरवनाथ हालिवली संघाने चौथा क्रमांक मिळवला. मुद्रे संघाच्या मंगेश घरतला उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला, तर उत्कृष्ट पकडीसाठी मानिवली संघाच्या मयूर गवळीला आणि उत्कृष्ट चढाईसाठी नेरळच्या करण खडे याला गौरविण्यात आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply