पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड फोर्टी प्लस मास्टर्स क्रिकेट क्लबच्या वतीने विजय खारकर यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त उलवे नोड सेक्टर 2च्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 19) करण्यात आले होते. या स्पर्धेस मान्यवरांची उपस्थिती लाभली.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी स्पर्धेस भेट देत विजय खारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप नेते एम. डी. खारकर, शरद खारकर, राजू खारकर आदी उपस्थित होते.
Check Also
कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक
कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …