Monday , January 30 2023
Breaking News

आज नागोठण्याचा वीजपुरवठा बंद

नागोठणे : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गालगतच्या विद्युत वाहिन्या दुसर्‍या ठिकाणी हलविण्याच्या कामासाठी मंगळवारी (दि. 21)  नागोठणे शहराचा विद्युत पुरवठा दिवसभर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता वैभव गायकवाड यांनी दिली. मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply