पनवेल ः खोपोली येथील कृष्णा साळुंखे यांनी 2020 सालची युवा प्रभात ही दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी प्रकाशन करण्यात आले.
भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस
पनवेल ः भाजपचे युवा नेते चंद्रशेखर पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, सरचिटणीस रवि शेळके, भालचंद्र पाटील, जीवन कडव, एकनाथ भोपी, शुभ पाटील, जयेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्यनारायणाची महापूजा
शिवकर (ता. पनवेल) ः भूमिपुत्र सामाजिक संस्था, ऑटो रिक्षा युनियनतर्फे प्रथम वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन दर्शन घेतले. आयोजकांनी त्यांचे स्वागत केले.
पीरबाबा उत्सवाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट
मोहो (ता. पनवेल) ः पीरबाबा उत्सवाला भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट दिली. त्यावेळचे छायाचित्र.