महाड : प्रतिनिधी
महाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विन्हेरे केंद्रातील हिवाळी क्रीडा स्पर्धा नुकतीच झाली. यात परिसरातील प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी
सहभाग घेतला.
किये केंद्राचे केंद्रप्रमुख जगदिश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जि. प. सदस्य निकिता ताठरे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत इयत्ता पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत खेळाचा आनंद लुटला. या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती सीताराम कदम, अनंत महाप्रळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रमोद दळवी, सरपंच श्री. बोरेकर, क्रीडा समिती प्रमुख वरंडे, दराडे, अंबारे, मेश्राम आदी उपस्थित होते.
या स्पर्धेतील कबड्डी खेळात मुलांमध्ये फॉक्स गट विजेता, टायगर गट उपविजेता, मुलींमध्ये फॉक्स गट विजेता, लायन गट उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मुलांच्या लंगडीतही फॉक्स गट विजेता, लायन गट उपविजेता, मुलींमध्ये टायगर विजेता व झेब्रा गट उपविजेता ठरला. गोणपाट उडीत मुलांमध्ये मंगेश विसापूरकर विजेता, सोहम संजय राठोड उपविजेता, मुलींमध्ये श्रावणी बाळकृष्ण सावंत व मानवी दीपक सावंत यांनी यश प्राप्त केले.
100 मीटर धावण्याच्या शर्यतीत मुलांमध्ये यश यादव विजेता, पार्थ फाळके उपविजेता, मुलींमध्ये श्रेया रवींद्र धोत्रे विजेती, सलोनी साळुंखे उपविजेती, मोठ्या गटात नमिता विजय जाधव आणि राकेश मोहिते यांनी क्रमांक पटकाविला. लांब उडीमध्ये गौरव कापसे विजेता, राकेश झोरे उपविजेता, तर मुलींमध्ये सलोनी आणि श्रेया धोत्रे यांनी यश संपादन केले.