Breaking News

नेरळमध्ये नेत्रचिकित्सा तपासणी शिबिर

कर्जत : प्रतिनिधी

निहरिका फाऊंडेशनच्या करिअर टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे नेरळ जिते फाटा येथील कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात 100 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी आरपीआयचे कोकण विभाग सचिव मारुती गायकवाड, आगरी समाज संघटनेचे सचिव शिवराम बदे, कोल्हारे ग्रामपंचायतीचे उपसरपंच रामदास हजारे आदी उपस्थित होते. उल्हासनगर येथील स्वर आनंद रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णांची नेत्रतपासणी पूर्ण केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी फाऊंडेशनचे गणेश भोपी, संजय बदे, अविनाश डायरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply