Breaking News

भारतीय जनता पक्षाने केला कळंबोलीकरांचा गणेशोत्सव गोड

कळंबोली : प्रतिनिधी – माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजप कळंबोली शहर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव सण गोड करण्यासाठी हजारो गोरगरीब व गरजू लोकांना साखर, गूळ, चणाडाळ, मैदा, रवा, तुप या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले असून कळंबोली शहरात गेली तीन दिवसांपासून अन्नधान्याचे वाटप बबन बारगजे, प्रियांका पवार, कमल कोठारी, बबन मुकदम, प्रकाश शेलार श्रीकांत ठाकूर,सिद्धेश बनकर करत आहेत. लॉकडाऊन झाल्यापासून विविध प्रकारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप पनवेल यांच्या वतीने नागरिकांची सेवा करून सर्वोतपरी मदत सुरूच राहिली आणि आजपर्यंतही हा मदतीचा ओघ सुरूच ठेवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील 60 हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचा एकत्रित पॅकेट देऊन गणपतीचा सण गोड झाला आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply