Monday , February 6 2023

कर्जतमध्ये शिवसेनेचा राष्ट्रवादीला दणका

किरवलीतील सुरेश लाड यांच्या कार्यकर्त्यांचा राम राम

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी आमदार सुरेश लाड यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष सत्तेत एकत्र असताना इकडे कर्जतमध्ये मात्र एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. किरवली येथील शेळके बंधू मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी सरपंच विकास बडेकर, माजी उपसरपंच रत्नाकर बडेकर, संजय बडेकर, प्रभाकर बडेकर, नेताजी बडेकर, योगेश बडेकर, संदीप ठाकरे, रमेश दिनकर, सावळाराम हांडे, बंधू बडेकर, शरद बडेकर, दिलीप पवार आदींनी शिवबंधन बांधून घेतले. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा संपर्कप्रमुख दत्ता दळवी, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply